पायाभूत सुविधा

गावडे आंबेरे हे सर्वांगीण विकासाच्या दिशेने प्रगती करणारे गाव असून विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

ग्रामपंचायत इमारत – गावडे आंबेरे मुख्य रस्त्यावर, मराठी शाळा क्र. १ जवळ ग्रामपंचायतीची स्वतंत्र, सुसज्ज इमारत आहे. येथे नागरिकांसाठी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

पाणीपुरवठा – जलस्वराज्य योजनेअंतर्गत संपूर्ण गावाला नळपाणी पुरवठा नियमितपणे केला जातो.

सार्वजनिक सुविधा – गावात ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, रेशन दुकान, विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणि सर्वोदय मच्छिमार सेवा सोसायटी अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

स्वच्छता – प्रत्येक घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी कचरा कुंड्या वितरित केल्या आहेत. तसेच रस्त्यांवरील प्लास्टिक कचरा संकलनाची नियमित व्यवस्था आहे.

रस्ते व प्रकाशव्यवस्था – गावातील रस्ते पक्के करण्यात आले असून बौद्धवाडीत सौर पथदिवे व हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत.

शैक्षणिक सुविधा – गावात दोन प्राथमिक शाळा व एक हायस्कूल कार्यरत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक व विद्यार्थी यांचा सक्रीय सहभाग आहे.

अंगणवाड्या – गावात तीन अंगणवाड्या आहेत, त्यापैकी दोनची स्वतंत्र इमारत असून एका अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत बांधकामाच्या प्रक्रियेत आहे.

आरोग्य सुविधा – बिर्जेवाडी येथे आरोग्य वर्धिनी उपकेंद्र कार्यरत असून येथे प्राथमिक उपचार, आरोग्य तपासणी, तसेच लसीकरण मोहिमा नियमित घेतल्या जातात.

वाचनालय – सध्या गावात स्वतंत्र वाचनालय नाही, परंतु ग्रामपंचायत भविष्यात अशी सुविधा उभारण्याचा प्रयत्न करत आहे.

खेळाचे मैदान – बौद्धवाडीत खुली व्यायामशाळा (ओपन जिम) असून युवकांसाठी खेळ आणि व्यायामाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

स्वयं-साहाय्य गट केंद्रे – गावात ३० बचत गट कार्यरत असून ‘सक्षम’ नावाचा ग्रामसंघ महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे.

बसथांबे व संपर्क सुविधा – गावात एकूण सात बसथांबे असून मराठी शाळा क्र. १ जवळ, केळकरवाडी, पाटीलवाडी, बिर्जेवाडी, हनुमानवाडी, आंबेरकरवाडी (शाळा क्र. २ जवळ), आंब्रेवाडी दत्त मंदिर आणि बौद्धवाडी (सांची बौद्धविहार) येथे बसथांबे आहेत. गावात तीन प्रवासी निवारा शेडची सोय आहे.

आरोग्य शिबिरे व लसीकरण मोहिमा – आरोग्य वर्धिनी उपकेंद्र व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावात नियमित आरोग्य शिबिरे व लसीकरण मोहिमा राबविल्या जातात.